दापोली – दापोली तालुक्यातील करंजाळी खापरेवाडी येथे विजेच्या तारेचा साफळा लावून रानडुक्कराची शिकार केली व घरी आणून त्याचे बारीक तुकडे केले व ते लपवून ठेवल्याप्रकरणी वनखात्याच्या अधिकार्यांनी दोघा भावांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी मुद्देमाल व हत्यारे जप्त करण्यात आली.
परिक्षेत्र वनअधिकारी दापोली यांनी करंजाळी येथे जावून आरोपी दशरथ धोंडू बुरटे व कृष्णकांत धोंडू बुरटे यांच्याकडे चौकशी करता प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु परिसराची तपासणी करता बंद घराच्या मागील बाजूस असणार्या गोठ्यामध्ये रानडुक्कराच्या अवयवाच्या मांसाचे बारीक तुकडे केले. दोन प्लास्टीक पिशव्या व प्लास्टीक बादलीमध्ये आढळून आले.