मुंबई -गोवा महामार्ग अनिश्चित काळासाठी ठप्प …

0
1736
बातम्या शेअर करा

चिपळूण- कोकणात कालपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने चिपळूण शहराला दणका दिला व प्रचंड वित्तहानी केली आता मुंबई गोवा महामार्गावरील वाशिष्टी नदीवरील महत्त्वाचं पूल असलेल्या ब्रिटिशकालीन पुलांचा काही भाग वाहून गेला आहे
आज पहाटे हा प्रकार घडला असून पुलाच्या मधोमध असलेला काही भाग वाहून गेला आहे त्यामुळे या मार्गावरील वाहतूक आता पूर्णपणे ठप्प झाली आहे या आधीच या पुलाला पर्यायी मार्ग असलेला एन्रॉन पूल सुधा खचल्याने बंद करण्यात आला आहे.

बहादूरशेख याठिकाणी उपस्थित असलेल्यांच्या म्हणण्याप्रमाणे गेले दोन दिवस या पुलावरून पाच ते सहा फूट पाणी सतत वेगाने वाहत होते हा पूल जुन्या काळातील ब्रिटिशकालीन होता नवीन पुलाचे काम सुरू असल्यामुळे या पुलावरूनच सध्या मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक सुरू होती आज पावसाचा जोर कमी झाल्यानंतर नदीच्या पाण्याचा जोरही कमी झाला परंतु आज पहाटेच्या सुमाराला या पुलाचा काही भाग वाहून गेला त्यामुळे पुलाचा भगदाड पडल्यासारखे दृश्य आहे मुंबई गोवा महामार्गावरील हा पूल महत्त्वाचा पूल असल्याने या पुलाच्या दुरूस्तीला आता किती काळ लागेल हे सांगता येत नाही त्यामुळे या मार्गावरील वाहतूक आता पुन्हा ठप्प होणार आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here