गुहागर तालुका प्रेस क्लब तर्फे आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते यांचा गौरव समारंभ

0
203
बातम्या शेअर करा


गुहागर – गुहागर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय गुहागर, प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली, कोविड केअर सेंटर, वेळणेश्वर या आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिक्षक, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच गुहागर तालुक्यात सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम राबविणारे सामाजिक कार्यकर्ते यांच्या समाजोपयोगी मौलिक कार्याबद्दल व कोरोना ( कोव्हिड – १९ ) या जागतिक आरोग्यविषयक समस्या काळात सेवाभावीवृत्तीच्या कार्याबद्दल “कोरोना योद्धा ” म्हणून गुहागर तालुका प्रेस क्लब गुहागर या संस्थेतर्फे गुरुवार दिनांक 22 जुलै २०२१ रोजी गुहागर, वेळणेश्वर व चिखली या ठिकाणी गुणगौरव समारंभ संस्थेचे पदाधिकारी व आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
गुहागर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय गुहागर, प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली व कोविड केअर सेंटर वेळणेश्वर या आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिक्षक, वैद्यकीय अधिकारी, नेत्रचिकित्सक अधिकारी, प्रयोगशाळा सहाय्यक, औषध निर्माण अधिकारी,औषध निर्माता, अधिपरिचारिका,परीसेविका, समुपदेशक,सहाय्यक परीसेविका, आरोग्य सेवक,आरोग्य सेविका, डाटा ऑपरेटर,परिचर, एच.एल. एल.(एल.टी.), एस.टी.एल.एस.,एल.टी.,एस.टी.एस.,सी.एच.ओ., मदतनीस, वाहन चालक, सफाईगार, सुरक्षा रक्षक या पदावरील अधिकारी व कर्मचारी यांची गुहागर तालुक्यात सेवाभावीवृत्तीने रुग्णसेवा व शासकीय कार्य सुरू आहे. आरोग्यविषयक उपक्रम व कार्यक्रम राबवून समाज जागृती तसेच प्रबोधन व सामाजिक सेवा सुरू आहे. कोरोना ( कोव्हिड – १९ )या जागतिक आरोग्यविषयक समस्या काळात सदर रुग्णालयातील आरोग्य वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची सेवाभावीवृत्तीचे मौलिक कार्य सुरू आहे.या मौलिक रुग्णसेवा व समाज कार्याबद्दल गुहागर तालुका प्रेस क्लब गुहागर या संस्थेतर्फे ग्रामीण रुग्णालय गुहागर, प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली व कोविड केअर सेंटर वेळणेश्वर या आरोग्य विभागातील वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी अशा एकूण ७९ जणांचा “”कोरोना योद्धा “”म्हणून गुहागर तालुका प्रेस क्लब गुहागर या संस्थेच्या पदाधिकारी व अधिकारी यांच्या हस्ते “सन्मानपत्र व पुष्पगुच्छ ” प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. तसेच गुहागरमधील सामाजिक कार्यकर्ते गुहागरचे सुपुत्र व मनसेचे माजी तालुकाध्यक्ष राजेश रमेश शेटे तसेच जानवळे गावचे सुपुत्र व विद्यमान गुहागर मनसेचे तालुका अध्यक्ष विनोद गणेश जानवळकर यांच्या सामाजिक व आरोग्यविषयक कार्यक्रम व उपक्रमांच्या मौलिक कार्याबद्दल “कोरोना योद्धा “म्हणून गौरवपत्र व पुष्पगुच्छ गुहागर तालुका गुहागर प्रेस क्लब गुहागरचे पदाधिकारी यांच्या हस्ते प्रदान करून सन्मान करण्यात येणार आहे.
गुहागर तालुक्यातील उर्वरित प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या मौलिक कार्याबद्दल व सेवाभावीवृत्तीच्या सेवेबद्दल आगामी काळात त्यांचाही सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात येणार असल्याचे नियोजन गुहागर तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष दिनेश चव्हाण व सचिव सुरेश आंबेकर यांनी सांगितले.सदर कार्यक्रमासाठी गुहागर तालुका प्रेस क्लब गुहागर या संस्थेच्या पदाधिकारी यांचे विशेष मौलिक सहकार्य लाभले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here