चिपळूण ; धक्कादायक ! पुराच्या पाण्यात अपरांत हॉस्पिटलमधील 8 कोरोना रुग्णांचा मृत्यू

0
1329
बातम्या शेअर करा

चिपळूण- चिपळूण शहरात पडत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका अखेर कोव्हिडं सेंटरला बसला आणि तब्बल 24 तासांपेक्षा अधिक काळ पुरात असलेल्या चिपळूणची विदारक स्थिती उघड होत असताना आता नगर पालिकेच्या समोर असणाऱ्या अपरांत हॉस्पिटलमधील 8 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती उपलब्ध होत आहे.

30 तास पुराने शहराला विळखा घातल्यानंतर अपरांत हॉस्पिटलमध्ये सुद्धा पाणी शिरायला लागले. तिथे 21 रुग्ण उपचारासाठी ठेवण्यात आले होते. त्यातील काही रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. मात्र पुराचे पाणी भरताचा हॉस्पिटलचा संपर्क तुटला होता. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संघमित्रा फुले यांनी दिली . काल गुरुवारी दुपारी 3.30 वाजता या हॉस्पिटल मधून शेवटचा संपर्क झाला होता.मात्र आज जसजस पाणी ओसरत आहेत तसे तिथली परिस्थिती पुढे येत असून 8 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

पुराचे पाणी शहरात भरत होतं त्यावेळेला या कोव्हिडं सेंटर मधील रुग्णांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने किंवा हॉस्पिटलने का प्रयत्न केले नाहीत ? या रुग्णांच्या मृत्यूला जबाबदार कोण? त्यांच्या मृत्यूची चौकशी होणार का ? याची चर्चा सध्या संपूर्ण चिपळूण रत्नागिरी जिल्ह्यात सुरू आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here