गुहागर – गुहागर- पालशेत नरवण या मार्गावरील पालशेत बाजारपेठेतील पूल बंद झाला. आणि पंधरा गावांचा संपर्क तुटला मात्र हा पूल ज्या कारणाने बंद झाला तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्या पुलावरील पाणी जाण्याच्या मार्गावर अडकलेली लाकडं हे काढण्यासाठी जेसीबी वापरण्यात आला होता.मात्र तो जेसीबी सार्वजनिक बांधकाम खात्याने वापरलेला नसल्याचं सार्वजनिक बांधकाम खात्याकडून स्पष्ट करण्यात आले त्यामुळे आता विनापरवाना ज्यांनी जेसीबी वापरला त्यांच्यावर कारवाई होणार का याकडे सध्या सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
पालशेत बाजारपेठेतील महत्वाचा अशा या पुलावरून पाणी जात असताना या पुलाच्या पाणी जाण्याच्या ठिकाणी अडकलेली लाकडं काढण्यासाठी जेसीबीचा वापर करण्यात आल्याचे काही दिवसापूर्वी व्हायरल झालेल्या व्हिडिओ मधून स्पष्ट झाल्या त्यानंतर या पुलावरील अडकलेली लाकडं किंवा कचरा काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने हा जेसीबी वापरल्याची चर्चा होती. मात्र या जेसीबी संदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकारी निकम यांनी तो जेसीबी आम्ही वापरला नसून आम्ही कामगार लावून तेथील झाडे ,झुडपे आणि लाकडं काढल्याचे सांगितले. त्यामुळे आता जेसीबी नक्की कोणी लावला ?कोणाच्या परवानगीने लावला? हा जेसीबी का लावला? अशा अनेक गोष्टीची माहिती घेण्यासाठी आम्ही वरिष्ठांकडे तो व्हायरल व्हिडिओ पाठवणार आहोत. आणि त्यानंतर ज्यांनी जेसीबी लावला त्याच्यावर योग्य ती कारवाई करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याने सांगितले. यामुळे एक मात्र स्पष्ट झाले की त्याच जेसीबी मुळे हा पूल कमकुवत झाला हे मात्र नक्की त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खाते नक्की कोणती भूमिका घेते याकडे सर्व पालशेत ग्रामस्थांच्या लक्ष लागून राहिले आहे.