नांदेड – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या उन्हाळी 2021 या शैक्षणिक वर्षातील परीक्षा कालपासून म्हणजेच 13 जुलैपासून सुरु झाल्या. मात्र विद्यापीठाने पाठवलेल्या ऑनलाईन परीक्षा लिंक ओपन न झाल्याने विद्यार्थी दिवसभर हैरान होते. पहिल्या दिवशी हजारो विद्यार्थी परीक्षेवाचून वंचित राहिले आहेत. नांदेड विद्यापीठाचा नियोजनशून्य आणि ढिसाळ कारभार पाहायला मिळाला. अखेर विद्यापाठीवर परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ आली आहे. विद्यापाठीच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या परीक्षा देण्यासाठी गाव कुसाबाहेर, शेतात व शहरात जाऊन सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत उपाशी राहून विद्यापीठाने पाठवलेली लिंक ओपन होण्याची विदयार्थी केविलवाणी वाट पाहत होते. मात्र दिवसभर लिंक ओपन न होता लिंकवर सर्वरचा प्रॉब्लेम येत असल्याने विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त केला. तर ऑनलाईन परिक्षेचा विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला.मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. असे कुलगुरू डॉक्टर उद्धव भोसले यांच्या उपस्थितीत झालेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
पदवी पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या 20 जुलै 26 जुलै पासून सुरू होण्याचा होणाऱ्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ही पुढे ढकलण्यात आल्या आहेत सुधारित वेळापत्रक लवकरच कळविण्यात येईल. मात्र महाविद्यालय स्तरावर क्लस्टर पद्धतीने होणाऱ्या परीक्षेच्या तारखेत बदल नाही. विद्यापीठाने ज्याकंपनीला सर्व्हर आणि साईडला या परीक्षा घेण्याचं टेंडर दिलं होतं ते सर्व्हरच अशाप्रकारे बोगस निघाल्याचे विद्यार्थ्यांमधून बोलले जात आहे. विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षेचा निर्णय घेताना योग्यप्रकारे सर्व्हर लिंक न केल्याने हा प्रॉब्लेम झाला