बातम्या शेअर करा

चिपळूण – (विशेष प्रतिनिधी )- रत्नागिरी जिल्ह्यातील आरपीआयच्या जिल्हाध्यक्षपदी सुरेश सावंत यांची निवड केल्यानंतर एकच वादळ उठलं होतं. ही निवड कोणालाही विश्वासात न घेता केली गेली असल्याने आरपीआय मधील अनेकजण नाराज होते. त्यामुळे सुरेश सावंत यांची उचलबांगडी करण्यात आली असून पुन्हा एकदा आरपीआयच्या जिल्हाध्यक्षपदी के.डी कदम हेच असतील असे कोकण प्रदेशाध्यक्ष जगदीश गायकवाड यांनी काल झालेल्या आरपीआयच्या बैठकीत जाहीर केल.

काही दिवसापूर्वी आरपीआयच्या रत्नागिरी जिल्हा अध्यक्षपदी गुहागर येथील सुरेश सावंत यांची निवड करण्यात आली होती या निवडीनंतर आरपीआय मध्ये नाराजी उमटली होती. कारण ही निवड कोणालाही विश्वासात न घेता कशी केली गेली ? असा प्रश्न कार्यकर्ते विचारत होते. याच या प्रश्नाच्या उत्तरासाठी नुकतीच कार्यकर्त्यांची एक बैठक कोकण प्रदेशाध्यक्ष जगदीश गायकवाड यांच्या उपस्थितीत पार पडली त्यावेळी या बैठकीत सर्व कार्यकर्त्यांनी मिळून एक ठराव केला आणि रत्नागिरी जिल्हा अध्यक्षपदी .के.डी. कदम कायम राहतील हे जाहीर करण्यात आल त्यानंतर यापुढे सर्व कामकाज डी के कदम यांच्या नेतृत्वाखाली होईल असे स्पष्ट करण्यात आले त्यामुळे सध्यातरी जिल्हा अध्यक्षपदावरून निर्माण झालेल्या वादावर पडदा पडला आहे. या बैठकीला कोकण प्रदेश अध्यक्ष जगदीश गायकवाड, दक्षिण मध्य मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे , दक्षिण मुंबई अध्यक्ष संजय पवार राज्य कार्यकारिणी सदस्य आणि रत्नागिरी जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते दादासाहेब मर्चंडे, जिल्हा उपाध्यक्ष शांताराम लोखंडे, जिल्हा संघटक धनेश रूके, सरचिटणीस प्रितम रूके प्रवक्ते अनंत पवार, कोषाध्यक्ष गौतम तांबे, माजी जिल्हाध्यक्ष प्रा. अनिल उरूणकर, आणि जिल्हा कमिटीचे पदाधिकारी आणि सर्व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते. सदर बैठकीच्या वेळी सुरेश सावंत हे हजर होते मात्र ते सर्वसामान्य कार्यकर्त्या प्रमाणे स्टेज वर न जाता कार्यकर्त्यांमध्ये बसले होते या निवडीवर त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here