वरवेली – (गणेश किर्वे )- गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस पॉवर कंपनीत मध्ये जागतिक योगा दिनानिमित्त श्री रत्नेश्र्वर मंदिर परिसरातील सर्व धर्म प्रार्थना केंद्रा मध्ये जागतिक योगा दिन संपन्न झाला यावेळी शासनाचे कोरोना संदर्भात असलेले नियम व अटींचे पालन करून करून योगा करण्यात आला. उपस्थितांना योगाचे महत्त्व पटवून देण्यात आले. त्यानंतर कंपनी परिसर व श्री रत्नेश्वर मंदिर परिसरामध्ये रत्नागिरी गॅस पॉवर कंपनीचे जनरल मॅनेजर हरभजन सिंग यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच यावेळी कामगारांना प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.