खेेेड- खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शनिवारी दि २९ रोजी फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या होमगार्ड व माध्यमांच्या प्रतिनिधींना सॅनिटायझर, मास्क व स्टीमर (वाफेचे) यंत्र माजी आमदार संजय कदम यांच्या हस्ते देण्यात आले. कोरोना साथीच्या संकटात चोवीस तास होमगार्ड व प्रसिद्धी माध्यमात काम करणारे प्रतिनिधी विविध शासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सोबत काम करत आहेत. राष्ट्रवादी पक्षाच्याने त्यांच्या कामगिरीची दखल घेत त्यांच्या सुरक्षेततेसाठी स्टीमर, सॅनीटायझर व मास्क भेट म्हणून दिली.
शहरातील द.ग.तटकरे सभागृहात हा विशेष कार्यक्रम शनिवारी पार पडला. यावेळी माजी आमदार संजय कदम यांनी होमगार्ड व माध्यम प्रतिनिधी यांच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधी किशोर साळवी, अजित जाधव, अश्विनी वडके, नंदेश खेडेकर, यश गांधी, सचिन खेडेकर, सुरेश पवार व हर्षल शिरोडकर यांना साहित्याचे वाटप करण्यात आले. होमगार्ड संजय कडू, उदय मोरे, प्रमोद दळवी, रेश्मा दांडेकर, किशोरी, कडमडकर, माया कदम, सुप्रिया निर्मळ आदीना किटचे वाटप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष स. तू. कदम, युवक तालुकाध्यक्ष ऍड अश्विनकुमार भोसले, महिला आघाडी प्रमुख ऍड. पूजा तलाठी, नगरसेविका जयमाला पाटणे, सौ.खेडेकर, शहराध्यक्ष सतीश चिकणे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतिश उर्फ पप्पू चिकणे यांनी केले. ऍड अश्विनकुमार भोसले यांनी सर्वांचे आभार मानले.