गुहागर – गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे पार पडलेल्या पहिल्याच गुहागर प्रीमियमलीग स्पर्धेत मुबारक घारे यांचा आझाद फायटर हा संघ अजिंक्य झाला.
शुंगारतळी येथे गेले चार दिवस गुहागर प्रीमियरलीग या क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धा रमीज लालु यांच्या पुढाकाराने आदर्श युवा मंच काळसूरकौंढर यांच्या संयुक्त विद्यमानाने शृंगारतळी येथील भव्य दिव्य अशा मैदानात पार पडल्या या स्पर्धेत एकूण सोळा संघ सहभागी झाले होते. ज्याप्रमाणे आयपीएलमध्ये लिलाव होतो त्याप्रमाणे या स्पर्धा लिलाव पद्धतीने खेळाडू घेऊन भरविण्यात आल्या होत्या. तालुक्यात अशा स्पर्धा प्रथमच भरवण्यात आल्या होत्या. या स्पर्धा कशा होतात? या स्पर्धचे संयोजन आणि नियोजन कसे केले जाते याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. मात्र आदर्श युवा मंच यांच्या योग्य नियोजनाने या स्पर्धा मोठ्या थाटामाटात पार पडल्या या स्पर्धेचा अंतिम सामना आझाद फायटर्स व फाईज इलेव्हन यांच्यात पार पडला पाच षटकांच्या सामन्यात आझाद फायटर्स या संघाने सुरुवातीपासून या सामन्यावर वर्चस्व गाजवत हा सामना आणि या स्पर्धेत विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यानंतर या स्पर्धेत सामनावीर व मालिकावीर म्हणून सत्यम गुरसाळे , बेस्ट फलंदाज प्रणित पालशेतकर ,बेस्ट गोलंदाज निकेश जाधव ,सर्वात जास्त षटकार किंग म्हणून प्रथमेश जाधव याला गौरविण्यात आले.
या स्पर्धेसाठी अनेक मान्यवरांनी भेट दिली त्यामध्ये शिवसेनेचे नेते किरण उर्फ भैय्या सावंत राष्ट्रवादीचे सहदेव बेटकर, गुहागरचे पोलीस निरीक्षक अरविंद बोडके, तालुक्यातील सर्व पत्रकार शुंगारतळी सरपंच संजय पवार, मालाणी ग्रुपचे सर्वेसर्वा नासिम मालाणी, रियाज ठाकूर आदींनी या स्पर्धेच्या ठिकाणी भेट देऊन या स्पर्धेचे कौतुक केलं.तर या स्पर्धा व्यवस्थित पार पडाव्यात म्हणून स्पर्धा प्रमुख रमीज लालु, लतीफ लालू, नासिम साल्हे , आसीम साल्हे, मंदार जोशी ,विवेक भिडे ,गौरव वेल्लाळ, मोहसीन मालगुंडकर, इब्राहिम मालगुंडकर, आदींसह तालुक्यातील अनेक या स्पर्धेसाठी आपला मोलाचा सहभाग दिला