चिपळूण -चिपळूण तालुक्यातील तनाळी येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दत्तजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. मात्र राज्यात कोरोनाच्या महामारीमुळे राज्य सरकारने केलेल्या आश्वासनानुसार नियमांचे पालन करून याठिकाणी हा दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे या मंडळाचे अध्यक्ष शिवराम झगडे यांनी सांगितले.
दत्तजयंतीच्या दिवशी सकाळी अभिषेक करून सत्यनारायणाची पूजा आयोजित केली आहे. त्याचप्रमाणे शासनाने दिलेल्या नियमांप्रमाणे ठराविक भाविकांना घेऊन पालखी प्रदक्षिणा करण्यात येणार आहे असे उत्कर्ष मंडळ दत्तवाडी तनाळीचे सचिव जयराम झगडे यांनी सांगितले.