गुहागर – गुहागर महसूल विभागाचे मंडल अधिकारी सचिन गवळी आणि त्यांचे सहकारी सुशिल परिहार यांनी काल रात्री केलेल्या धडक कारवाईच्या वेळी आबलोली परिसरात अवघ्या दोन तासात वाळूच्या 5 गाड्या पकडल्या. सदर वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई सुरु असून एकूण 2 लाख 1 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी ही वाळु रत्नागिरी तालुक्यातील राई येथून आणल्याचे सांगितले आहे.
गुहागर महसुलचे धडाकेबाज मंडल अधिकारी सचिन गवळी आणि तलाठी सुशिल परिहार यांनी आबलोली ,असोरे, काजुर्ली या भागात ग्रस्त घालत होते. त्यावेळी आवरे फाटा पाच वाहनांची तपासणी केली असता अवैध वाळु वहातूक होत असल्याचे लक्षात आले.
यावेळी वाहनात वाळू आढळून आली. मंडल अधिकारी आणि तलाठ्यांनी सर्व वाहने जप्त केली. सकाळी पंचनामा करुन पाचही वाहनमालकांना दंड भरण्याची नोटीस देण्यात आली आहे.