रत्नागिरी – कोकण रेल्वे मार्गावर आणखी दोन फेस्टिव्हल स्पेशल गाड्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यातील एक गाडी मंगळुरू सेंट्रल ते लोकमान्य टिळक टर्मिनस तर दुसरी दादर ते तामिळनाडूमधील तिरुनेलवेली दरम्यान धावणार आहे.
कोकण रेल्वेमार्गे धावणार्या आणखी दोन गाड्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यातील (02620/19) ही- गाडी मंगळुरु सेंट्रल ते मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावणार आहे.ही गाडी दि. 17 ते 31 डिसेंबर या कालावधीत मंगळुरुहून दुपारी 2 वा. 25 मिनिटांनी सुटून दुसर्या दिवशी पहाटे 6.35 वाजता लो. टिळक टर्मिनसला पोहचेल. उलट दिशेच्या प्रवासात ही गाडी लो. टिळक टर्मिनसहून दि. 18 डिसेंबर 2020 ते 1 जानेवारी 2021 या कालावधीत दुपारी 3 वा. 20 मिनिटांनी सुटून दुसर्या दिवशी सकाळी 7.30 वाजता मंगळुरुला पोहचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कुडाळ, मडगावमार्गे मंगळुरुला जाईल.
दुसरी साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी (06072/71) दि. 16, 23 व 30 डिसेंबर2020 रोजी तामिळनाडूतील तिरुनेलवेलीहून सकाळी 7.15 वा. सुुटून दादरला दुसर्या दिवशी दुपारी 3 वा. पोहचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी दादरहून दि.17, 24 व 31 डिसेंबर रोजी रात्री 8.40 सुटून तिसर्या दिवशी पहाटे 4 वा. तिरुनेलवेलीला पोहचेल. कोकण रेल्वे मार्गे मार्गावर ही उडपी, कारवार, मडगाव, थीवी, कणकवली, रत्नागिरी तसेच चिपळूण ही स्थानके घेत पनवेलमार्गे ती दादरला जाईल.