चिपळूण – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून अपरान्त हाॅस्पिटल व माधवबाग किल्लिनिक यांच्या सहकार्याने चिपळूणमध्ये बुधवार दिनांक ९ डिसेंबर ते रविवार दिनांक १३ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजता मोफत आरोग्य तपासणी शिबिर स्पिंग्ज किल्लिनिक पिंपळ गणेश मंदिर खेंड येथे आयोजित करण्यात आले आहे.अशी माहिती आमदार शेखर निकम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या शिबिरात रक्त तपासणी, शरिरातील लोहाचे प्रमाण, रक्ततातील विविध घटकांची चाचणी, साखरेचे प्रमाण,क्ष किरण तपासणी, रक्तदाब, शरिरातील ऑक्सिजनचे प्रमाण,बि.एम.आय.विविध आजारांमध्ये पंचकर्म व इतर चिकित्सा विषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.अशी माहिती यावेळी देण्यात आली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयंद्र खताते, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, माजी सभापती शौकत मुकादम, दादा साळवी, मनोज जाधव, युवक तालुकाध्यक्ष सिद्धेश लाड,राजु जाधव, नगरसेविका फैरोजा मोडक आदी उपस्थित होते. या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे करण्यात आले आहे.