खेड ; कोरोना बाधित कर्मचारी आढळल्याने बैंक ऑफ इंडियाच्या खेड शाखेचे कामकाज बंद ग्राहकांची गैरसोय

0
342
बातम्या शेअर करा


खेड- बैंक ऑफ इंडियाच्या खेड शाखेचा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने खबरदारी म्हणून बैंक ऑफ इंडियाची खेड शाखा ग्राहकांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. आर्थिक व्यवहार ठप्प राहिल्याने ग्राहकांची मात्र गैरसोय झाली. कोरोना पॉझिटिव्ह आलेला कर्मचारी अनेकांच्या संपर्कात आल्याची शक्यता असल्याने खेडमध्ये पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
सर्दी खोकल्याचा त्रास होत असलेल्या एका कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी करण्यात आली. दुर्दैवाने ती चाचणी सकारात्मक आल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोनाबाधित असलेला कर्मचारी बैंकेमध्ये अनेकांच्या संपर्कात आलेला असल्याने आणखी काहीजण बाधीत आवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणारा खेड तालुका पुन्हा कोरोनाच्या विळख्यात तर अडकणार नाही ना? अशी भिती व्यक्त केली जात आहे.
आज सकाळी बँकेचे ग्राहक नेहमी प्रमाणे बँकेत आर्थिक व्यवहारासाठी आले मात्र बँकेच्या गेटवर बँकेत कोरोना पॉझिटिव्ह कर्मचारी सापडल्याने बँकेचे सर्व कामकाज बंद राहिल असा सुचना फलक लावण्यात आलेला पहावयास मिळाला. बँकेचे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प राहिल्याने ग्राहकांची मात्र फार मोठी गैरसोय झाली. पैशाची गरज असलेल्या काही ग्राहकांनी थेट फुरूस येथील शाखेत धाव घेतली मात्र तिथेही बीएसएनएलचे नेट नसल्याने त्या शाखेतही ग्राहकांच्या पदरी निराशाच आली.
खबरदारी म्हणून बंद ठेवण्यात आलेली खेडची शाखा आणखी किती दिवस बंद राहणार आहे. हे सुचना फलकावर नमुद केलेले नसल्याने ग्राहकांचा संभ्रम वाढला आहे. याबाबत शाखा व्यवस्थापकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here