अहमदपूर – अहमदपूर तालुक्यातील सोनखेड -मानखेड येथील मन्याड नदी वरील कोल्हापुरी बंधाऱ्यांचे जल पूजन लोकप्रिय आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवानंद हेगने, महेश बँकेचे उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे, जिल्हा परिषद सदस्य माधवराव जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवक कांग्रेस प्रशांत भोसले, जिल्हा अधिकारी आर एस खोडे, एस बी जाधव उपविभागीय जलसंधारण अधिकारी, प्रकाश बरुरे, उत्तम नारागूडे विष्णु सांगोळे, दिगंबर सांगोले, चंद्रकांत सांगोळे, रमेश जाधव, रवि पाटील, श्रीधर नारागुडे आदी सह शेतकरी बांधव उपस्थित होते.