मुंबई – महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या १४ आणि १५ डिसेंबर रोजी मुंबईत घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोनच दिवसाचे अधिवेशन होत आहे. कामकाज सल्लागार समितीच्या विधानभवन येथे आज (गुरुवारी) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत दोनदिवसीय अधिवेशन घेण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.