रत्नागिरी – रत्नागिरी डेपोतील एका चालकाचा मृतदेह त्याच्या राहत्या भाड्याच्या घरात आज दुपारी आढळून आल्याने सर्वत्र खळबळ माजली या चालकांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक अंदाज एसटी प्रशासन कडून वर्तविण्यात आले असून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. बीड येथील मुळचा रहिवाशी असलेला हा चालक आज नांदेड प्रवासी ड्युटी करून पहाटे तो रत्नागिरीत आला होता.
त्यांनतर तो सध्या राहत असलेल्या भाड्याच्या खोलीत होता. मात्र दुपारी दुसरा सहकारी खोलीवर गेला असता दरवाजा न उघडल्याने हा प्रकार समोर आला आहे.
एसटी कर्मचारी यांचा 3 महिने पगार नसल्याने सद्या सर्वच कर्मचारी तणावाखाली आहेत. दिवाळी आली तरी अद्यापही पगार झाले नाहीत.त्यामुळे तीन महिने पगार नसल्याने संबंधित चालकाने आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतल्याची चर्चा एसटी कर्मचारी यांच्यामध्ये सुरू आहे.