नांदेड – लातूर-नांदेड या राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी आमदार बाबासाहेब पाटील यांनी आज नांदेड येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले त्यामुळे त्यांची दखल घेत येत्या आठ दिवसात काम सुरू न झाल्यास संबंधित ठेकेदारचा काम काढून घेतले जाईल असा धमकी वजा इशारा देताच अखेर हे उपोषण सोडण्यात आले.
गेल्या अनेक दिवसापासून लातूर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील पडलेले खड्डे बुजवावेत म्हणून अनेक पत्रव्यवहार करून सुद्धा बुजवण्यात येत नसल्याने व या सर्व गोष्टीला प्रशासन जबाबदार आहे. व या सर्व गोष्टीचा मनस्ताप चाकुर- अहमदपुर विधानसभा मतदारसंघातील जनतेला सहन करावा लागत असल्याने या घटनेच्या निषेधार्थ आज चाकुर- अहमदपुर विधानसभा मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी नांदेड येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयाच्या समोर लाक्षणिक उपोषण केले व जोपर्यंत येथे अधिकारी येऊन खड्डे बुजवण्यात संदर्भात ठोस आश्वासन देत नाहीत तोपर्यंत मी व माझे सहकारी इथून उठणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली.
यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता श्री पाटील यांनी या ठिकाणी येऊन संबंधित ठेकेदाराशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला व जर येत्या सोमवारपर्यंत काम सुरू केले नाही झाले तर काम दुसऱ्याला देण्यात येईल अशी तंबी संबंधितला देण्यात आली व सोमवारपासून काम सुरू होईल अशी हमी कार्यकारी अभियंता यांनी घेतली आहे.
यावेळी शिवानंद हेंगणे, अर्जुन आगलावे, निवृत्तीराव कांबळे, माधवराव जाधव, प्रशांत भोसले, शाम देवकते, विठ्ठल चव्हाण, वसंत शेटकर, अझहर बागवान, दयानंद पाटील, किरण बारमले, गंगाधर ताडमे, इलियास सय्यद, सतिष नवटक्के, फिरोज शेख, मेजर, तानाजी राजे, संग्राम गायकवाड, आशिष तोगरे, संदीप शिंदे, बाळासाहेब बेडदे, व्यंकट वंगे, सचिन जाधव, लिंबाजी गंगापूरे, अनिल बेंबडे अमित जाधव, धनराज पाटील, गणेश जाधव, बालाजी तिडोळे, सुदर्शन बेंबडे, शेख आयुब, शेख इझराइल सह आधी उपस्थित होते.
Home महाराष्ट्र मराठवाडा लातूर-नांदेड या राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी आमदार बाबासाहेब पाटील यांचे उपोषण