खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या पितापुत्राचा शॉक लागून मृत्यू

0
495
बातम्या शेअर करा

राजापूर – महावितरणची ११ केव्ही क्षमतेची विद्युतभारीत वाहिनी खेकडे पकडत असलेल्या ओढ्यात पडल्याने त्याचा शॉक लागून पितापुत्राचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना राजापूर तालुक्यातील नाणार गावी घडली .काल सायंकाळी घडलेल्या या घटनेने नाणार गावासह पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे .

नाणारमधील ग्रामपंचायतीतील शिपाई दिवाकर पूजारी हे आपला मुलगा अथर्व याच्यासह गावातीलच ओढ्यावर खेकडे पकडण्यासाठी गेले होते . याच ओढ्यावरून महावितरणची ११ केव्हीची विद्युत वाहिनी गेलेली आहे . या वाहिनीच्या कंडक्टर तुटल्याने विद्युतभारित वाहिनी ओढ्यात कोसळली .
याच दरम्याने हे दोघे पितापुत्र खेकडे पकडण्यासाठी ओढ्यात उतरले होते . त्यांना शॉक बसून त्यांचा मृत्यू ओढवला . या दुर्घटनेनंतर महावितरणचे अधिकारी अपघातस्थळी पोहोचले होते . रात्री उशीरापर्यंत घटनेची माहिती घेण्याचे व पंचानामा करण्याचे कामा सुरू होते .


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here