चिपळूण – चिपळूण तालुक्यातील दसपटी येथील कोळकेवाडी वाघजाई क्रीडा मंडळाचा खेळाडू शुभम शिंदे यांची भारतीय कबड्डी संघात निवड झाली आहे. यामुळे चिपळूणच्या क्रीडा क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
राजस्थान येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याने उत्कृष्ट प्रदर्शन करून निवड समितीचे लक्ष वेधले होते. महाराष्ट्र राज्य संघातून खेळताना अनेकवेळा त्याने चमकदार कामगिरी करून स्वतःला सिद्ध केले आहे भारतीय प्राथमिक संघात शुभम शिंदे व मुंबई शहर कबड्डी संघाचा पंकज मोहिते या दोन महाराष्ट्रातील खेळाडूंची निवड झाली आहे. शुभमचे आमदार शेखर निकम, शिवसेना तालुकाप्रमुख प्रतापराव शिंदे, जिल्हाप्रमुख सचिन कदम, कबड्डी असोसिएशनचे तालुकाध्यक्ष बाबू तांबे आदींनी अभिनंदन केले आहे.