गुहागर:- गुहागर -चिपळूण रोडवर असलेल्या गुहागर तालुक्यातील गिमवी या गावी पोलीस आणि आर्मी भरतीसाठी प्रशिक्षण सुरु झाले असून त्याची वेळ रोज सकाळी ६.३० ते सकाळी ८ वा.पर्यंत आहे. यासाठी कोणत्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही. १०वी आणि १२वी पास मुले व मुली यांनी यासाठी येण्याची व जाण्याची व्यवस्था स्वतः करावी. प्रशिक्षणामध्ये प्राथमिक सर्व माहिती आणि शारीरिक शिक्षण दिले जाईल. पहिली बॅच जवळपास भरली असून कुणाला प्रशिक्षण घ्यायचे असल्यास त्वरित संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी मुख्य प्रशिक्षक श्री. जितेंद्र गोंधळेकर, माजी सैनिक ९६०४३६०८९२ यांच्याशी संपर्क साधावा.