गुहागर – गुहागर तालुक्यातील आबलोली पंचक्रोशीत कोरोनाचे पेंशट वाढत आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसताच वेळीच निदान होण्यासाठी आबलोली मध्ये अँटीजेन टेस्टची सुविधा उपलब्ध करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन बाईत यांनी केली आहे. यासाठी प्रशासनाला आवश्यक असलेली इमारतहि उपलब्ध करून देण्यात आल्याचे सचिन बाईत यांनी सांगितले.
शैक्षणिक, राजकीय ,सामाजिक, व्यावसायिक दृष्ट्या आबलोली हे मध्यवर्ती ठिकाणी असल्याने याठिकाणी विविध कामांसाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने येत असतात.
अशावेळी बाजारपेठेतील दुकाने व अन्य ठिकाणे गर्दीने गजबजून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता असते. अशावेळी एखाद्या नागरिकांना कोरोनाची टेस्ट झाल्यास त्याला वेळणेश्वर येथे कोविड सेंटरमध्ये जावे लागते.हे अंतर लांब असल्याने जो पर्यंत नागरिक जास्त आजारी पडत नाहीत, तोवर ही टेस्ट करुन घेत नाही. त्यामुळे काही दिवसात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला दिसतो. तरी प्रशासनाने अँटीजन टेस्टची मागणी तालुका प्रमुख श्री. बाईत सुविधा उपलब्ध करून
नागरिकांना दिलासा द्यावा, अशी यांनी केली आहे.