गुहागर – गुहागर तालुक्यातील शुंगारतळी येथे कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणत सापडत असल्याने शुंगारतळी बाजारपेठ व ग्रामपंचायत परिसरात पाच दिवसांचा जनता कर्फ्यु जाहीर करण्यात आला आहे. मात्र व्यापारी संघटनांनी याचा विरोध केला आहे.
आज गुहागर तालुक्यात एकाच दिवशी 32 पॉसिटीव्ह रुग्ण पॉसिटीव्ह रुग्ण सापडले तर शुंगारतळी मध्ये ग्रामपंचायत व एका बँक मध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. यातच आता शृंगारतळीत ग्रामपंचायत दिनांक 11 ते 15 सप्टेंबर दरम्यान पाच दिवसांचा जनता कर्फ्यु जाहीर केला आहे.याच वेळी
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक व्यापाऱ्याने अँटिजेन टेस्ट करण्याचे आवाहन पाटपन्हाळे ग्रामपंचायतने व्यापाऱ्यांना केले आहे.
मात्र असे असले तरी येथील काही व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवण्याच्या निर्णयाला विरोधकेला आहे.
