गेले अनेक वर्ष पत्रकारिता करत असताना वाचकांना वेगळे काही देण्याचा प्रयत्न आम्ही केला. आणि याच दरम्यान आम्ही प्रगती टाइम्सची सुरुवात करून नव्या वाटचालीला सुरुवात केली. या वाटचालीत सर्वांनीच शाब्दिक व आर्थिक बळ दिल्याने तसेच आपले अमुल्य मार्गदर्शन आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद लाभल्याने आज आपले प्रगती टाइम्स पुन्हा एका पुढे वाटचाल करत नवीन वर्षात पदार्पण करत आहोत.
अनेक वर्ष पत्रकारितेच्या माध्यमातून सातत्याने काम करत असताना आपल एक वृत्तपत्र असावे असं सतत वाटत असायचं ज्याच्यात आपल्या सगळ्यांना न्याय देता यावा सडेतोड जनतेचे प्रश्न मांडता यावेत, नियमितपणे वृत्त प्रसिद्ध करून सर्वसामान्य जनतेला प्रामाणिकपणे न्याय देता यावा त्यासाठी हे वृत्तपत्र सुरू केले. यावेळी वृत्तपत्राच्या या माध्यमातुन अनेक ठिकाणच्या समस्यांना वाचा फोडली तर प्रशासनाला जाणीव करून दिली सर्वांगिन विकाससाठी प्रखरपणे भूमिका मांडत होतकरू आणि समाजासाठी महत्त्वाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींना प्रगती टाइम्सच्या माध्यमातून कायम प्रोत्साहन देण्याचे काम केले.
आजच्या या आधुनिक युगात प्रिंट मीडिया टीव्ही मिडीया यांच्या बरोबर राहण्याचा आम्ही प्रयत्न करत असून त्यासाठीच दोन वर्षांपूर्वी आम्ही प्रगती टाइम्स ऑनलाईन पोर्टल या मध्ये पदार्पण केले. वाचक व जाहिरातदार यांनी त्याचे स्वागत केले. ऑनलाइन मीडियाच्या माध्यमातून आम्ही फक्त रत्नागिरी जिल्ह्यात नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलो. त्यामुळे ही प्रगती टाइम्सचे वाचक वाढण्यास मदत झाली. त्याचबरोबर आमच्या ऑनलाईन प्रगती टाइम्स’च्या वाचकांनी आमच्यावर विश्वास ठेवत आमच्या आलेल्या प्रगती टाइम्सच्या बातम्या ची लिंक आपल्या मोबाईलच्या स्टेटस ला ठेवले तर काहींनी शेअर आणि फॉरवर्ड करून आमच्या प्रगती टाइम्सच्या प्रसिद्धीमध्ये मोलाचा हातभार लावला त्या सर्वांचे आम्ही प्रगती टाईम च्या वतीने शतशः आभारी आहोत. याही पुढे प्रगती टाइम्स तेवढ्याच जोमाने काम करील आणि वाचकांना नक्कीच वाचण्यास आवडेल असा प्रगती टाइम आम्ही आपल्या देऊ हे मात्र तेवढेच निश्चित.
आमच्या प्रगती टाइम्स प्रिंट मधील पान नंबर तीन हे महिलांसाठी खूप वाचनीय असुन महिलांच्या याच आग्रहमुळे आम्हाला घरा- घरात मानाचे स्थान मिळाले आहे.याही पुढे महिलांसाठी विशेष असे हे आगळ-वेगळं असं पान कायम राहील व त्यात अजुन वाचनीय असे विषय आम्ही मांडू.
सध्याच्या या आधुनिक काळात वृत्तपत्र टिकून ठेवणे एक मोठ आव्हान आमच्यासमोर आहे. मात्र आपल्या सर्वांचे पाठबळ आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी समर्थपणे असल्याने आम्ही याहीपुढे याहीपेक्षा दर्जेदार प्रगती टाइम्स आपणास पर्यंत देण्याचा प्रयत्न करणार आहोत प्रगती टाइम्स सुरू झाल्यापासून वेळोवेळी मार्गदर्शन करणारे गुहागर तालुक्यासह सर्व पत्रकार मित्र तसेच आम्हाला जाहिरातीच्या माध्यमातून आर्थिक बळ देणारे जाहिरातदार प्रगती टाइम्सचे सर्व हितचिंतक वाचक वर्ग त्याचबरोबर स्थानिक जनतेबरोबर येथील प्रशासनाने दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून सर्वांचे जाहीर आभार मानतो.