बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर येथील समुद्रकिनारी असलेली जेटी आज पासून पाडण्यास सुरवात झाली. सीआरझेड एक मध्ये केलेले अनधिकृत बांधकामे तोडण्याचे आदेश हरित लवादाने दिले होते. या आदेशांच्या अंमलबजावणी अंतर्गत हे जेटी तोडण्याचे काम पतन विभागाच्या देखरेखीखाली आजपासून सुरु आहे.

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात समुद्र दर्शनी तोडण्याच्या कामाला सुरवात झाली. दोन दिवसात समुद्र दर्शनी तोडण्याचे काम पूर्ण झाले. हे काम उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकामा विभागाचे उपअभियंता, महाराष्ट्र प्रदुषण मंडळ, वन खात्याचे अधिकाऱ्याच्या उपस्थित करण्यात आले. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीत पतन विभागाने समुद्र जेटी तोडण्याच्या कामाला सुरवात केली. यावेळी यावेळी पतन उपविभाग दापोलीचे उपअभियंता लक्ष्मण तनपुरे, कनिष्ठ अभियंता अमोल कांबळे, राकेश जाधव उपस्थित होते.

जेटी तोडण्यासंदर्भातील माहिती देताना उपअभियंता लक्ष्मण तनपुरे म्हणाले की, जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशांप्रमाणे जेटी तोडण्यास सुरवात केली आहे. जेटीचे बांधकाम क्रॉक्रीटमध्ये केलेले असल्याने ब्रेकर वापरुन फोडावे लागणार आहे. त्यामुळे संपूर्ण जेटी तोडण्यास ५ ते ६ दिवसांचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी लागेल. जेटी तोडल्यानंतरचा राडारोडा टाकण्यासाठी शासकीय जागा उपलब्ध करुन द्यावी अशी विनंती आम्ही नगरपंचायतीला केली आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here