खुशखबर;अखेर ई -पास रद्द

0
422
बातम्या शेअर करा

मुंबई- मार्च महिन्यापासून राज्यात सुरु असलेली जिल्हा बंदी अखेर आज उठली आहे.राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी लागणारा ई -पास अखेर राज्यसरकारने रद्द केला आहे. त्यामुळे राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी परवानगी लागणार नाही. राज्य सरकारने मिशन बिगेन अगेन अंतर्गत लॉकडाऊनमध्ये अनेक सवलती दिल्या आहेत, त्याची नियमावली आज जाहीर झाली आहे. राज्य सरकारच्या नव्या गाईडलाईननुसार, हॉटेल आणि लॉज सुरू होणार आहेत. मात्र मेट्रो, सिनेमा गृह बंदच राहणार आहेत. तर मुंबई आणि एमएमआरमध्ये शासकीय कार्यालय ३० टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत तर उर्वरित महाराष्ट्रात शासकीय कार्यालयात ५० टक्के कर्मचारी उपस्थित राहतील.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here