चिपळूण – चिपळूण तालुक्यातील 755 जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून ही दिलासादायक बाब आहे. आज दिवसभरात आलेल्या अहवालानुसार आणखी 10 नव्या रूग्णांची भर पडली असल्याने तालुक्याचा आकडा 1076 वर गेला आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून चिपळूण तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. प्रशासनातील मुख्य कोरोना योध्यानाही कोरोनाची बाधा झाली आहे. मात्र गणेशोत्सव पासून बाधितांच्या संख्येत थोडी घट होतानाचे चित्र पहायला मिळत आहे.
आता चिपळूण तालुक्यात कोरोनाबाधितचा आकडा 1076 वर गेला आहे. यात शहरातील 508, ग्रामीण भागातील ठरत आहे. 568 रूग्णांचा समावेश आहे. 288 जणांवर उपचार सुरू असुन 33 जणांचा मृत्यू झाला. तर आतापर्यंत 755 रुग्ण बरे झाले आहेत.
















