चिपळूण – राज्यभरात भाजपच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात येत असून चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने येथील देवी पद्मावतीच्या मंदिरात भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर विनय नातू यांच्या उपस्थितीत घंटानाद आंदोलन करण्यात आले.
कोरोना संक्रमण काळात 22 मार्चपासून राज्यातील सर्व मंदिर बंद आहे. हे मंदिर पुन्हा सुरू करावी यासाठी हा घंटानाद आंदोलना भाजपने केले आहे. जैन धर्मियांचे मंदिर सुप्रीमकोर्टाच्या आदेशानुसार पुन्हा सुरू झाले आहेत. तर मग आमची मंदिरे का सुरू होत नाहीत. असा सवालही भाजपकडून करण्यात येत आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारला इतर सर्व बाबतीत वेळ आहे. मात्र हिंदूंच्या असलेल्या देवतांचा मंदिराबद्दल उघडण्याबाबत कोणताही निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करण्यासाठी भाजपच्या वतीने आज राज्यभरात घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे. त्या घंटानाद आंदोलनानंतर महाविकास आघाडी सरकारला जाग येऊन हे सरकार आता तरी मंदिराचे दार उघडणार का ?असाच प्रश्न आता सर्वसामान्य म्हणून विचारला जात आहे. या घंटानाद आंदोलनासाठी महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महिला उपाध्यक्ष नीलिमा गोंधळी ,अजित साळवी ,नंदू गोंधळी ,सौरभ चव्हाण ,मार्गताम्हाणे सरपंच प्रभाकर चव्हाण गणेश साळवी, रणजीत चव्हाण, विनीत चव्हाण, प्रशांत गोंधळेकर, शितल गोंधळेकर ,पंकज चव्हाण, यासह माजी सरपंच गोंधळेकर यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.