पंढरपूर – तालुक्यातील ज्येष्ठ नेते माजी आमदार तसेच एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक यांचे सोमवारी रात्री साडेअकरा वाजता पुण्यात उपचारादरम्यान कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्यावर पुणे येथील वैकुंठ स्मशानभूमीत मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सुधाकर पंत परिचारक यांनी आजवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन पद देखील भूषवले. अनेक आजारी कारखान्यांना त्यांनी ऊर्जितावस्था आणली. राजू बापू पाटील यांच्या नंतर परिचारक यांचेही निधन झाल्यामुळे पंढरपूर तालुक्यातील दुसरा मोठा नेता कोरोना मुळे मृत्युमुखी पावला आहे. राजूबापू पाटील यांच्यानंतर मोठा नेता हरपल्याने तालुक्यावर मोठी शोककळा पसरली आहे.