बातम्या शेअर करा

दापोली – शिवसेना आमदार योगेश कदम यांच्या प्रयत्नाने दापोली येथील उपजिल्हा रूग्णालयात कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यात आल्याने कोरोना बाधीत रूग्णांना चांगलाच दिलासा मिळणार आहे.त्यामुळे शिवसेनेच्या या सामाजिक कामाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
कोरोना पॉझीटीव्ह रूग्णांच्या उपचारासाठी अत्यंत आवश्यकता असलेला कोविड हेल्थ सेंटर आमदार योगेश कदम यांच्या अथक प्रयत्नाने दापोली उपजिल्हा रूग्णालयात सुरू झाला आहे.त्यामुळे ज्या कोरोना बाधीत रूग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो अशांना आता अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात पावणे दोनशे किमीचे अंतर तोडून रत्नागिरीत जावे लागणार नाही. शिवसेनेच्या प्रयत्नाने सुरू करण्यात आलेल्या या कोविड हेल्थ सेंटर मध्ये 20 बेडची क्षमता असून सर्व बेडला आँक्सीजनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबरच एक व्हेल्टिलेटरही उपलब्ध करून देण्यात आला आहे.
दापोली उपजिल्हा रूग्णालयात सुरू करण्यात आलेल्या या कोविड हेल्थ सेंटर मध्ये पहिल्याच दिवशी दोन कोरोना बाधीत रूग्ण उपचार घेत असल्याची माहिती रूग्णालयाचे अधिक्षक डॉ.महेश भागवत यांनी दिली.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here