सांगली – महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु असल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. आज कृष्णा नदीची पाणी पातळी ३२ फुटांवर जाऊन पोहोचली. त्यामुळे शहरातील सुर्यवंशी प्लॉटमधील घरांमध्ये पाणी शिरले आहे. यानंतर प्रशासनाकडून येथील १० कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.
कृष्णा नदीसह वारणा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढल्यामुळे नदीकाठावरील १०४ गावांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच सखल भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.