चिपळूण- रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात एकूण ८०९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण झाले असुन शहरी भागात ४०९ तर ग्रामीण भागात ४00 रुग्णांचा आकडा वाढला आहे.यात २५ रुग्णांचा बळी गेला असुन २८० कोरोनाबाधित अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
तालुक्यात अॅक्टिव्ह रुग्ण शहरी भागात १५७ तर ग्रामीण भागात १२३ आहेत. आजवर शहरी भागात २४१ तर ग्रामीण भागात २६३ असे ५०४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तालुक्यात एकूण २५ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असून यात शहरातील ११ व ग्रामीण भागातील १४ रुग्णांचा यात समावेश आहे. तालुक्यात सध्या २८० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती चिपळूण तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी दिली.