गुहागर ; एकाच वेळी तीन फेसबुक अकाउंट हॅक करुन पैशांची मागणी

0
313
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर शहरातील चिपळूण अर्बन बँकेचे संचालक अजय खातू, पत्रकार मनोज बावधनकर आणि अमोल गोळे या  तीनही व्यक्तीची  फेसबुक अकाउंट शनिवारी रात्री हॅक झाली. आणि या हॅक झालेल्या अकाऊंट वरून हे तिघेही आपल्या फेसबुक फ्रेंडकडे पैशाची मागणी करत असल्याने हा प्रकार उघडकीस आला. हा प्रकार मनोज बावधनकर आणि अजय खातूं यांना लशात येताच त्या दोघांनी  पोलीसांमध्ये तक्रार दाखल केली आहे.

गुहागर येथील अजय खातू, पत्रकार मनोज बावधनकर आणि अमोल गोळे यांच्या फेसबुक मित्रांना मेसेंजरवर संदेश येऊ लागले. या संदेशांमध्ये मला पैशांची गरज आहे. तातडीने पैसे पाठवून द्या. गुगल पे करणार की पेटीएमने करणार ते सांगा. तसे तपशील मी देतो. असे संभाषण हिंदीमध्ये होते. सुरवातीला या तिघांच्या मित्रांना काहीच समजत नव्हते. वरचापाट येथील व्यापारी अद्वैत गोखले यांनी रात्री ही गोष्ट अजय खातू यांना सांगितली. तर विक्रम खरे यांनी मनोज बावधनकर यांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर तिघांचे फेसबुक अकौंट हॅक झाल्याचे समोर आले. या प्रकरणी मनोज बावधनकर आणि अजय खातू यांनी गुहागर पोलीसठाण्यात तक्रार नोंदवली आहे. गुहागर पोलीस अधिक तपास करत आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here