गुहागर – रत्नागिरी जिल्ह्यात सगळ्यात प्रथम कोरोना रुग्ण हा शुंगारतळी सापडला होता. त्यानंतर काही नागरिकांना कोरोना होऊन नंतर गुहागर तालुका हा संपूर्ण कोरना मुक्त झाला होता. आता याच गुहागर तालुक्यातील गुहागर शहरात व वेळणेश्वर येथे आज तब्बल 12 -12 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने गुहागर शहर आता हॉटस्पॉट बनले असून संपूर्ण गुहागर शहर आयसोलेट करण्याची मागणी होत आहे.
राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आणि कोरोना वायरसची लक्षणे दिसू लागल्या पासून गुहागर शहर कोरोना पासून कोसो दूर होत. मात्र एक ऑगस्टपासून गुहागर शहरात कोरोनाने शिरकाव केला आणि त्या दिवशीपासून या शहरातील कोरोना बाधित यांची संख्या वाढत गेली. त्याच वेळी भविष्यात गुहागर शहर हॉटस्पॉट होते की काय याची भीती वाटू लागली होती. त्यातच आज याच गुहागर तालुक्यात पंचवीस कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. यामध्ये गुहागर शहरात 12 रुग्ण वेळणेश्वर येथे बारा रुग्ण व वेलदूर येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
.