गुहागर -गुहागर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढता असल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पाटपन्हाळे ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच संजय पवार यांनी दिली आहे.
मानवी शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण मोजणारे पल्स ऑक्सिमीटर व कोरोनाची लक्षणे शोधणारे अलोडिटेक्शन ऑफ सिंपरन्स बी पल्स ऑक्सिमीटर यंत्र पाटपन्हाळे ग्रा.पंचायतने खरेदी केले आहे. गणेशोत्सवासाठी येणारे ग्रा.पं.हद्दीतील चाकरमानी व स्थानिक नागरिकांची काळजी घेण्यासाठी सदरची ग्रा.पंचायत हा आरोग्यदायी उपक्रम येत्या काही दिवसात राबविला जाणार असल्याची माहिती सरपंच संजय पवार यांनी दिली आहे.