लातुर – काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं वयाच्या 91 व्यावर्षी निधन, मूत्रपिंडाच्या आजारावर उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.
काही दिवसापूर्वीच त्यांनी कोरोनावर मात केली होती. त्यानंतर पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. रात्री 2.30 वाजता त्यांचे निधन झाले. आज निलंगा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले,सुना, नातवंडे असा मोठा परिवार असून भाजपाचे माजी मंत्री आणि आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे त्यांचे नातू आहेत.