बातम्या शेअर करा

चिपळूण- कोकणात सलग दोन दिवस पडणाऱ्या पावसाने आज पुन्हा एकदा चिपळूण शहरात पाणी भरले शहरातील भाजी मार्केट , मच्छिमार्केट,जुनाबाजार पूल आदी ठिकाणी पाणी भरले असून शहरातील सखल भागात पाणी भरण्यास सुरवात होत आहे. तर गुहागर-कडे जाणाऱ्या एस टी बस बायपास मार्ग वळवण्यात आल्या आहेत.

शहरातील व्यापाऱ्यांना आवाहन करण्यात येते की , चिपळूण शहर आणि आसपासच्या परिसरामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस झाल्याने अजून शहरामध्ये पाणी भरण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे सर्व व्यापाऱ्यांनी आपले साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे ज्यामुळे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी.तसेच शहरातील नागरिकांनी कोणत्याही मदतीकरिता नगरपरिषदेच्या चोवीस तास सुरू असलेल्या नियंत्रण कक्षामध्ये फोन करावा असे आव्हान चिपळूण नगरपरिषद तर्फे करण्यात आले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here