उमरोली जिल्हा परिषद गट ;अन्यथा सर्व जागेवर उमेदवार उभे करणार – विक्रम साळुंखे

0
418
बातम्या शेअर करा

चिपळूण – काही दिवसांनी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची चर्चा सध्या सर्वच भागात सुरू आहे. त्यातच चिपळूण येथील जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण साठी राखीव झाल्याने या गटाची चर्चा जास्त सुरू आहे. आघाडी झाल्यास या गटात तोडगा काढू अन्यथा या गटातील पंचायत समितीच्या दोन आणि जिल्हा जिल्हा परिषदेची एक जागा आम्ही स्वतंत्र उमेदवार देऊन लढणार असल्याचे या विभागाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटप्रमुख विक्रम साळुंखे यांनी सांगितले.

उमरोली जिल्हा परिषद गट हा यावेळी सर्वसाधारण साठी राखीव झाला आहे. त्याचबरोबर या गटातील दोन पंचायत समिती गणापैकी एक पंचायत समिती गण ही सर्वसाधारण गटासाठी राखीव आहे. त्यामुळे चिपळूण तालुक्यातील हा जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण हा निवडणुकीआधीच जास्त चर्चेत आला आहे. त्यातच अनेक राजकीय पक्षांमधून अनेक जणांनी आपण इच्छुक असल्याचे दाखले देण्यास सुरुवात केली आहे. मात्र असं असलं तरी सध्या राज्यातील राजकारण पाहता ही निवडणूक म्हणावी तेवढी सोपी राहणार नाही. महायुती मधील किंवा आघाडी मधील कोणत्याही घटक पक्षाला जर नाराज केले तर त्याचे परिणाम या निवडणुकीतील उमेदवाराला भोगावे लागतील त्यातच आता उमरोली जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटविभाग प्रमुख विक्रम साळुंखे यांनी या गटामध्ये आघाडी झाल्यास काहीही अन्यथा सर्व तीनही जागा लढवणार असल्याचे सांगितले त्या दृष्टीने त्यांनी सर्व तयारी ही युद्ध पातळीवर सुरू केली आहे. नुकत्याच झालेल्या एका सभेत हा निर्धार सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी बोलून दाखवला. माजी आमदार रमेश कदम तालुका प्रमुख मुराद याचे मार्गदर्शन विभागाला कायम असते आणि त्यातच पंचायत समिती सदस्य नंदू शिर्के ,प्रकाश साळवी, महेश कातकर उप तालुका प्रमुख निलेश चव्हाण ,ज्येष्ठ नेते नंदु सावंत,नाना शिर्के,दिगंबर भोसले,इत्यादी मातब्बर मंडळी याचे मार्गदर्शन आणि विभागात मिळत असलेला राष्ट्रवादी पक्षाला मोठा पाठिंबा या सर्व बाबी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. आमदार भास्कर जाधव आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते यावर योग्य ती चर्चा करतीलच परंतु कोणत्याही परस्थिती मध्ये ही निवडणूक लढायची आणि जिंकायची हा ठाम निर्धार उमरोली जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा आहे. असे विक्रम साळुंखे यांनी सांगितले.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here