महावितरणचे थकलेले ४० लाख चिपळूण नगरपालिकेने केले अदा

0
71
बातम्या शेअर करा

चिपळूण – चिपळूण नगर परिषदेने महावितरणचे थकलेले सुमारे ४० लाख रुपये ठरल्याप्रमाणे मंगळवारी अदा केले आहेत. त्यामुळे वादाचा एक अंक संपला असून महावितरण आपला थकीत असलेला सुमारे ४७ लाख रुपयांचा कर भरणार की त्याविरोधात अपिल करणार हे येत्या १० दिवसात स्पष्ट होणार आहे.

गेल्या १४ वर्षांपासून महावितरण नगर परिषदेला विविध मालमत्तांपोटी सुमारे ४७ लाख रुपये देणे आहे. याबाबत नगर परिषदेने महावितरणकडे अनेकदा पत्रव्यवहार केला आहे. मात्र तरीही कायदेशीर बाबी पुढे करीत, असा कर आम्ही देणेच लागत नाही, याविरोधात आम्ही अपिल करणार आहोत अशी भूमिका महावितरणने घेतली आहे. तर नगर परिषद, अन्य जिल्हयातील महावितरणची कार्यालये हे कर भरत असल्याच्या पावत्या तसेच काही ठिकाणी याबाबत न्यायालयाने दिलेले निर्णयाच्या प्रती दाखवत आहे. तरीही महावितरणकडून हा कर भरला जात नाही. त्यामुळे याला उत्तर म्हणून गेल्या दोन वर्षांपासून नगर परिषदही नळपाणी योजनेचे बिल भरत नसल्याने ही रक्कम सुमारे ४० लाख रुपये झाली होती. यातूनच महावितरणने काही दिवसांपूर्वी नगर परिषदेच्या खेर्डी-माळेवाडी येथील जॅकवेलचा वीजपुरवठा खंडित केला. त्यानंतर नगर परिषदेने महावितरणच्या पॉवरहाऊस येथील उपकेंद्राला सील ठोकले

या वादात जिल्हाधिकारी एम. देवेंदरसिंह यांनी मध्यस्थी केल्यानंतर दोघांनीही आपली कारवाई मागे घेतली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत नागरिकांशी संबंधित कारवाई करताना समन्वय ठेवण्याच्या सूचना केल्या. तर पालकमंत्री सामंत यांनी दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या आहेत. असे असतानाच नगर परिषदेने मंगळवारी ठरल्याप्रमाणे महावितरणचे सुमारे ४० लाख रुपये अदा केले आहेत. तर महावितरणला त्यांचा थकीत कर भरण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे. त्यातील ५ दिवस उलटून गेले आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here