सातारा – (प्रवीण गाडे )- सातारा जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून लॉकडाऊन शिथिल केला जाईल असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले. मात्र या कालावधीत जिल्हावासीयांना घरातही मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. दुचाकीवर डबल सीटला परवानगी देण्यात आली आहे. सलूनसह सर्व दुकानांची वेळ वाढवून सकाळी 9 ते रात्री 7 वाजेपर्यंत ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. शाळा व महाविद्यालयांना गुणपत्रिका वाटण्यास परवानगी देण्यात आली आहे. शिवाय अत्यावश्यक सेवा, एमआयडीसी, खासगी आस्थापनांना अटी व शर्तींवर परवानगी देण्यात आली असून नियमांचे उल्लंघन करणार्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत.

राज्य शासनाने लॉकडाऊन शिथिल करत नव्या काही आस्थापनांना परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊनसंदर्भात गुरुवारी रात्री नवे आदेश जारी केले.
हे सुरू…
सर्व दुकाने, शॉप, औद्योगिक व खासगी आस्थापना
रेस्टॉरंट व फूड कोर्टमधून होम डिलव्हरी
सलून दुकाने, स्पा, ब्युटी पार्लर
शाळा, महाविद्यालयांत उत्तरपत्रिका मूल्यांकन व निकाल घोषणा
50 टक्के क्षमतेने जिल्ह्यांतर्गत एसटी
दुचाकीवर डबल सीटला परवानगी
मॉल व कॉम्प्लेक्समधील मार्केट (5 ऑगस्टपासून)
सेतू, महा ई-सेवा केंद्रे, आधार केंद्रे
हे बंद…
वृद्ध, गर्भवती महिला, लहान मुलांना घराबाहेर पडण्यास प्रतिबंध
चित्रपटगृहे, जीम, व्यायामशाळा, पोहोण्याचा तलाव
समााजिक, राजकीय, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम
धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे
















