चिपळूण — येथील ओम साई मित्र मंडळाचे साईभक्त दिनांक २९ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान साईंच्या दर्शनासाठी शिर्डी येथे मुंबई ते शिर्डी असे पदयात्रेने जाणार आहेत. तत्पूर्वी साई भक्त तथा वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टसचे चेअरमन प्रशांत यादव यांच्यातर्फे मुख्य प्रवर्तक व चिपळूण नागरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांनी साई भक्तांचे चिपळूण- खेर्डी येथील साई मंदिरात स्वागत करीत शिर्डी पद यात्रेकरिता शुभेच्छा दिल्या. ओम साई मित्र मंडळाने देखील समाधान व्यक्त करीत यादव कुटुंबियांचे आभार मानले आहेत.
शिर्डीला पायी जाणे ( शिर्डी पदयात्रा) ही एक धार्मिक परंपरा आहे. ज्यामध्ये साईबाबांचे भक्त शिर्डी शहरात पायी जातात. ही यात्रा साई भक्तांसाठी एक महत्वपूर्ण आणि श्रद्धेचा भाग आहे. अनेक साईभक्त मुंबईतून पायी शिर्डीला जातात. ही संख्या हजारोंच्या घरात आहे. पदयात्रेदरम्यान भजन गातात, कीर्तन करतात आणि साईबाबांचा जयघोष करीत शिर्डीच्या दिशेने वाटचाल करतात. चिपळूणमधील देखील हजारो साईभक्त शिर्डीला पदयात्रेने जातात.
यामध्ये ओम साई मित्र मंडळाचा देखील समावेश आहे. या मित्र मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी मुंबई ते शिर्डी पदयात्रा करण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी शनिवारी वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांच्या निवासस्थानी असलेल्या साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी सौ. यादव यांनी ओम साई मित्र मंडळाच्या साई भक्तांचे स्वागत करून मुंबई ते शिर्डी पदयात्रेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी धार्मिक व भावनिक वातावरण निर्माण झाले होते. या मंडळाचे साईभक्त चिपळूण ते मुंबई बसने प्रवास करणार असून नंतर ते शिर्डीकडे पदयात्रेने रवाना होणार आहेत.
यामध्ये ओम साई मित्र मंडळाच्या साई भक्तांमध्ये सुमित खताते, दयानंद भोजने, रोहित करंजकर, गणेश मते, रोहन लाड, राजेंद्र कानापुडे, गणेश बागवे, विनोद मते, शुभम भोजने, साहिल गायकर, प्रथमेश मोरे, राकेश पाटील, गौरव उदेग, विशाल खोपडकर, प्रवीण कलकुटकी, जयेश सावंत, आकाश सावंत, रोहित सावंत, निखिल दुडे, महेश हुमणे, विवेक पाटील, पार्थ फुले यांचा समावेश आहे. यावेळी चिपळूण नागरीचे प्रशांत वाजे, महेश खेतले, अविनाश गुडेकर, . कदम, संदीप पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे फैसल पिलपिले, महेश महाडिक, मिलिंद दाते, संकेत कदम ,अमोल बामणे ,सचिन कांबळे, प्रतीक शिंदे, अमित गुढेकर, रोहित खांबे, ओंकार महाडिक, दिलीप साबळे आदी उपस्थित होते.