लोटे एमआयडीसी मधील या कंपनीत झाला स्फोट

0
157
बातम्या शेअर करा

खेड ; रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात लोटे औद्योगिक वसाहतीमधील विनती ऑरगॅनिक कंपनीत आज दुपारी साडे बाराच्या सुमारास भीषण अपघात झाला. बॉयलरचा एअर प्री-हिटर दाबामुळे अचानक फुटल्याने झालेल्या स्फोटात समीर कृष्णा खेडेकर या कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला.

समीर खेडेकर हे स्फोटाच्या वेळी घटनास्थळी एकटेच कार्यरत होते. स्फोटात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. घटनेनंतर तातडीने त्यांना लाईफ केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी कामथ येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला. या अपघाताची माहिती विनती ऑरगॅनिक कंपनीचे एचआर मॅनेजर सचिन खरे यांनी दिली असून, कंपनीमार्फत या घटनेची सखोल चौकशी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनीही घटनास्थळी भेट देत पुढील तपास सुरू केला आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here