सागरी मंडळाची राजापूर, रत्नागिरीत कोटीची उड्डाणे कामांच्या निधी वाटपात विरोधाभास – डॉ. नातूंची तक्रार

0
57
बातम्या शेअर करा


गुहागर – जिल्हा नियोजन समितीच्या २०२४-२५ च्या आराखड्यात बंदरालगतच्या सुखसोयी निर्माण करणे या सागरी मंडळाकडील कामांचा आढावा घेतला असता एकूण कोटीची तरतूद करण्यात आली होती. यामध्ये सर्वाधिक निधी राजापूर, रत्नागिरीतील कामांसाठी देण्यात आल्याचा आरोप माजी आ. डॉ. विनय नातू यांनी केला आहे. याविरोधात त्यांनी मत्स्यविकास मंत्री नितेश राणे यांच्याकडे तक्रार केली आहे.


दापोली मतदारसंघातील मंडणगड तालुक्यातील २ कामांसाठी ३७ लाख, गुहागर मतदारसंघातील खेड तालुक्यातील ३ कामे व गुहागरमधील एका कामासाठी १ कोटी, चिपळूण मतदारसंघातील संगमेश्वर तालुक्यातील ३ कामांसाठी एक कोटी रुपये, रत्नागिरीतील चार कामांसाठी १ कोटी १५ लाख तर राजापूर मतदारसंघातील राजापूरसाठी ४ कामे व लांजा तालुक्यातील एका कामासाठी दीड कोटीची तरतूद करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक निधी हा रत्नागिरी, राजापूरला देण्यात आला आहे. हा प्रत्येक मतदारसंघातील निधी वाटपातील विरोधाभास असून ठराविक तालुक्यांनाच झुकते माप देण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्वच भागातील बंदरांचा विकास झाला पाहिजे, जेणेकरुन पर्यटन वाढेल व जिल्ह्याचा जीडीपी वाढेल, हे सागरी मंडळाने पाहिले पाहिजे होते. मात्र, तसे न होता निधीचे समान वाटप झाले नसून याबाबत लक्ष वेधण्यासाठी मत्स्यविकास मंत्र्यांकडे निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती डॉ. नातू यांनी दिली.

अंगणवाड्या दुरुस्तीचा सर्वाधिक निधी राजापूरला
महिला बालकल्याण विभागामार्फत जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्यात अंगणवाड्यांच्या इमारती नव्या बांधण्यासाठी दापोलीला ३४ लाख, गुहागरला ३४ लाख, रत्नागिरी, राजापूर, चिपळूणला प्रत्येकी ४५ लाख निधी देण्यात आला, त्यामुळे थोडाफार न्याय सर्वच भागांना बऱ्यापैकी दिला गेला असला तरी अंगणवाडी इमारतींच्या दुरुस्तीसाठी सर्वाधिक निधी राजापूर मतदारसंघाला दिला गेला असल्याचा आरोप डॉ. नातू यांनी केला आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here