माणुसकीला काळीमा फासणारी घटना ,आईनेच विकलं पाच वर्षांचं बाळ

0
420
बातम्या शेअर करा

दापोली –सामाजिक भान सुटल्याची आणि माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना कोकणात घडली आहे. एका आईने आपल्या पाच वर्षांच्या चिमुकल्याला आर्थिक फायद्यासाठी विकल्याची घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी गुहागरमधील एका व्यक्तीसह संबंधित आईला दापोली पोलिसांनी अटक केली आहे.

ही घटना २६ जून २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजता गुहागर एस.टी. स्टँड परिसरात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अरबिना सुफियान पांजरी (वय २४, रा. हर्णे, बाजारमोहल्ला) हिने आपल्या ५ वर्षांच्या मुलगा अरहान सुफियान पांजरी यास सत्यवान दत्ताराम पालशेतकर (वय ५२, रा. बोऱ्या कारुळ, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) यास विकले. यावेळी सत्यवान पालशेतकर याने सदर बालकाची खरेदी केल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत दापोली पोलिसांनी दोघांविरुद्ध ‘बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५’ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरेमठ यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

ही घटना समोर येताच संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू आहे. बालकाचे पुढील सुरक्षिततेच्या दृष्टीने काय उपाययोजना केली जात आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here