गुहागर – काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी गजानन जाधव यांची निवड

0
179
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुका इंदिरा काँग्रेस अध्यक्षपदी मळण गावचे सुपुत्र दिलीप जाधव यांची आज निवड करण्यात आली.

गुहागर तालुक्यात काँग्रेस काही घरापर्यंतच मर्यादित राहील होती. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस म्हणावी तशी या तालुक्यात वाढली नाही. आता याचं काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी तरुण तडफदार असे दिलीप जाधव यांची गुहागर तालुका काँग्रेस अध्यक्षपदी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी निवड केली आहे.

गुहागर तालुक्यातील दिलीप जाधव हे मळण गावचे रहिवासी ,गुहागर तालुका तेली समाज सेवासंघाचे ऊपाध्यक्ष, गुहागर तालूका प्रेस क्लब संचालक, तसेच विविध क्षेत्रातील पदांवर कार्यरत असून जनसेवेचे ऊत्तम कार्य करीत असणारे व सर्व समाजातील लोकांजवळ मिळून मिसळून रहाणारे व सर्वाशी चांगले संबंध ठेवून मानाने जिवन जगणारे तसेच एक ऊत्तम मूर्तिकार नावाजलेले गजानन ऊर्फ दिलीप जाधव यांची गुहागर तालुका काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे सध्या सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. लवकरच पदभार स्वीकारून आपण तळागाळापर्यंत काँग्रेस पक्षाचे विचारसरणी पोहोचवणार असल्याचे दिलीप जाधव यांनी प्रगती टाइम्सची बोलताना सांगितले.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here