मुंबई – गोवा महामार्गावर खोपी फाटा येथे अपघात दोन जण गंभीर जखमी

0
178
बातम्या शेअर करा

खेड- मुंबई – गोवा महामार्गावरील खोपी फाटा नजीक दोन मालवाहू ट्रक मध्ये भीषण अपघात झाला या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत

चिपळूणहुन मुंबई दिशेने जाणारा आयशर टेंपो मुंबईकडून चिपळूण दिशेने जात असलेल्या कंटेनर हे दोन्ही मालवाहू ट्रक समोरा समोर धडकल्याने अपघात झाला. या अपघातात आयशर टेम्पो चालक रामलखन प्रजापती , संजय मेवालाल चौधरी राहणार युपीहे दोघे गंभीर जखमी असून या घटनेची माहिती मिळताच भरणे नाका ब्रिजखाली उभी असणारी श्री जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान नानिजधाम २४ तास मोफत रुग्णवाहिकेच्या मदतीने प्राथमिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय कळंबनी बु. येथे दाखल करण्यात आले आहे. मदत ग्रुपचे प्रसाद गांधी यांनीही यावेळी मदत कार्यात सहकार्य केले.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here