गुहागर ; नगरपंचायत कचरा संकलन रस्ते नालेसफाई टेंडर निघणार कधी वर्षभरानंतर ही घोळ संपेना..?

0
94
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर शहरातील एक ते सतरा या वार्डमधील कचरा संकलन , रस्ते व नालेसफाई करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून टेंडर प्रक्रिया सुरू आहे. मात्र अद्यापही कोणत्याही कंपनीला टेंडर न दिल्याने खरोखरच हे टेंडर निघणार आहे.? की नाही किंवा गुहागर मधील या कचऱ्याबाबत नगरपालिका उदासीन आहे का ? कारण काही दिवसातच पावसाळा सुरू होणार आहे त्यातच हा प्रश्न अद्याप न सुटल्याने शहरातील कचऱ्याबाबत काय होणार असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.

कोकणच्या समुद्रकिनाऱ्यावरील निसर्गरम्य ठिकाण म्हणून गुहागर हे शहर प्रसिद्ध आहे. या शहराची ग्रामपंचायतीची नगरपालिका झाली. त्यानंतर शहराच्या विविध विकास कामांना सुरुवातही झाली. अनेकांच्या पसंतीस उतरलेलं हे गुहागर शहर नेहमीच पर्यटकांच्या गर्दीने गजबजू लागले. त्याचवेळी मोठ्या प्रमाणात शहरात कचराही जमू लागला हा कचरा उचलण्यासाठी गुहागर नगरपंचायतीने ऑगस्ट 2024 मध्ये प्रथम निविदा काढली. मात्र पहिला निविदेस तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर पुन्हा एकदा निविदा काढत आत्तापर्यंत चार वेळा निविदा काढण्यात आली. मात्र असे असले तरी गुहागर नगरपंचायतीने अद्यापही कोणत्याही ठेकेदारास कचरा संकलन करण्याचा ठेका दिलेला नाही. त्यामुळे नक्की ही निविदा म्हणजे फक्त शोबाजी काय,? असा प्रश्न त्या निमित्ताने पडला आहे. सध्या या गुहागर शहरातील कचरा गुहागर नगरपंचायतीचे सहा कर्मचारी गोळा करतात मात्र मनुष्यबळ कमी असल्याने शहरातील ठिकठिकाणीचा कचरा हा योग्य वेळी उचलला जात नाही. अशी तक्रार नेहमीच केली जाते. याबाबत गुहागर नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी स्वप्नील चव्हाण यांना संपर्क साधला असता त्यांनी कचरा संकलन टेंडर हे निवडणुकीच्या कालावधीमुळे पूर्ण होऊ शकले नाही मात्र आता लवकरच यावर ठोस निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.

तर याच कचरा संकलन रस्ते आणि नालेसफाई टेंडर बाबत एका ठेकेदाराने हे कचरा संकलन टेंडर आपल्याच मर्जीतील ठेकेदाराला मिळावी म्हणून जाणून-बुजून आत्तापर्यंत कोणत्याही ठेकेदारास दिला नसल्याचा आरोप केला आहे.तसेच हे टेंडर आम्ही पात्र असतानाही आम्हाला दिले गेले नाही अशी तक्रार रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here