रामपूर – (सुहास चव्हाण )- रत्नागिरी जिल्ह्यातील शेवटची जत्रा म्हणून चिपळूण तालुक्यातील रामपूरची जत्रा प्रसिद्ध आहे. ही यात्रा यावर्षी रामपूर ग्रामदेवता चैतावली 25 एप्रिल रोजी रामपूर तळ्याचीवाडी येथील सहाणेवर यात्रा होणार आहे. या चैतावली यात्रेत १६ ग्रामदेवता पालख्या सहभागी होणार आहेत.
यजमान पालखी रामपूर केदारनाथ हिला भेटण्यासाठी रामपूर वरदान, देवखेरकी येथील अमृतेश्वर, मानाई देवी, वैजी ग्रामदेवता, निर्व्हाळ, पाथर्डी, नवरतवाडी, पोसरे, मिरजोळी, कोंढे, कळवंडे माडवाडी, पाग, पिंपळी, गोंधळे, सार्पिली या ग्रामदेवतांच्या पालख्या येणार आहेत. हा स्नेहमिलनाचा मंगलमय सोहळा होणार असून रात्रौ स्नेहमेलन भेटीनंतर कोंढे गोपाळवाडीचे नमन आयोजित केले आहे. आकर्षक विद्युत रोषणाई, हॉटेल, दुकाने खेळणी, मिठाई यांची रेलचेल या यात्रेत असणार आहे. जिल्हाभरातील भक्तगण मोठ्या भक्ती भावाने केदारनाथ चैतावली यात्रेस उपस्थित राहतात. या यात्रेला सर्व भाविकांनी उपस्थित राहावे,असे आवाहन रामपूर केदारनाथ सेवा मंडळाचे अध्यक्ष विलास चव्हाण यांनी केले आहे.