कोल्हापूर – अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या ४६ व्या राष्ट्रीय स्पर्धेत ऍथलेटिक्समध्ये (पुरूष गटात) हरियाणा संघाने विजेतेपद तर महिला गटामध्ये महावितरणला विजेतेपद, व्हॉलीबॉलमध्ये हिमाचल प्रदेशला विजेतेपद तर पंजाबला उपविजेतेपद तर कॅरममध्ये (पुरूष गटात) महावितरणला विजेतेपद तर कॅरम (महिला गटात) महावितरणनेच विजेतेपद पटकावले. स्पर्धेमध्ये एकूण १३ संघानी सहभाग नोंदविला.
कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात महापारेषण, महानिर्मिती व महावितरण कंपनीच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या तीन दिवसीय राष्ट्रीय स्पर्धेचा आज समारोप झाला.
या राष्ट्रीय स्पर्धेच्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला महानिर्मितीचे संचालक अभय हर्णे, महापारेषणच्या कराड परिमंडलाच्या मुख्य अभियंता तथा क्रीडा स्पर्धा आयोजन समितीच्या अध्यक्षा शिल्पा कुंभार, महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, महानिर्मितीचे मुख्य अभियंता संजय कुऱ्हाडे, शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे अधिष्ठाता डॉ. शरद बनसोडे, स्पर्धेचे निरीक्षक अमरेंद्र सिंह, सुरेंदर शेवकंद, महापारेषणचे मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी तथा उपाध्यक्ष भरत पाटील, महानिर्मितीचे सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी ललित गायकवाड, महावितरणचे उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर, महानिर्मितीचे कल्याण अधिकारी प्रसाद निकम, अधीक्षक अभियंता श्रीकृष्ण नवलाखे, महेंद्र गायकवाड, अशोक सागरे, सहाय्यक महाव्यवस्थापक प्रशांत चौधरी उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र कुलकर्णी व सुरेश पाटील यांनी केले. या स्पर्धेच्या आय़ोजनासाठी महापारेषणच्या कराड परिमंडलाच्या मुख्य अभियंता तथा क्रीडा स्पर्धा आयोजन समितीच्या सगळ्यांनी खूप मेहनत घेतली.
ऍथलेटिक्स स्पर्धेमध्ये (पुरूष गटात) हरियाणा अव्वल :
ऍथलेटिक्स स्पर्धेमध्ये (पुरुष गटात) हरियाणाने विजेतेपद मिळविले. तर महावितरणाला उपविजेतेपद मिळाले. तर पंजाब संघाने तृतीय क्रमांक पटकाविला.
ऍथलेटिक्स स्पर्धेमध्ये (महिला गटात) महावितरण अव्वल :
ऍथलेटिक्स स्पर्धेमध्ये (महिला गटात) महावितरणने विजेतेपद पटकाविले. तर बिहारला उपविजेतेपद मिळाले. महानिर्मितीच्या संघाने तृतीय क्रमांक पटकाविला.
व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये हिमाचल प्रदेश अव्वल :
खेळाडूंनी एकावर एक गोल केल्यामुळे व्हॉलीबॉल स्पर्धा अतिशय लक्षवेधी ठरली. व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये हिमाचल प्रदेशने विजेतेपद तर पंजाब संघाने उपविजेतेपद पटाकाविले. तर महावितरणने तृतीय क्रमांक पटकाविला.
कॅरम स्पर्धेमध्ये (पुरूष गटात) महावितरण अव्वल :
कॅरम स्पर्धेमध्ये (पुरुष गटात) महावितरणने विजेतेपद तर टाटा पॉवरने उपविजेतेपद पटकाविले. तर तेलंगणा संघाने तृतीय क्रमांक पटकाविला.
कॅरम स्पर्धेमध्ये (महिला गटात) महावितरण अव्वल :
कॅरम स्पर्धेमध्ये (महिला गटात) महावितरणने विजेतेपद तर तेलंगणा संघाने उपविजेतेपद पटकाविले. तर महानिर्मितीने तृतीय क्रमांक पटकाविला.